पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
मनवेल बारदेस्कर एजूकेशन सोसायटी गारगोटी संचालित मनोबल प्रकल्प लिंक वर्कर कोल्हापूर यांच्या मार्फत शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र घेण्यात आलेल्या स्मृतिगंध या कार्यक्रमात टिबी व एचआयव्ही या विषयावर रांगोळी स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत शिरोली,टोप,नागाव, कासारवाडी,हालोंडी गावातील आशा सेविकांनी सहभाग घेवून सुबक अशा रांगोळीचे रेखाटन केले.यावेळी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ जेसिका अँड्रयुस यानी आपल्या केंद्रातील व उपकेंद्रातील आशा सेविकांच्या कामाचा आढावा सांगितला .मनवेल बारदेस्कर एजूकेशन सोसायटी गारगोटी संचालित मनोबल प्रकल्प लिंक वर्कर कोल्हापूर हि जिल्ह्यातील टिबी एचआयव्ही या आजारावर काम करणारी संस्था असून यांच्या मार्फत जागतिक एचआयव्ही दिना निमित्त जिल्ह्यातील हायवे , मुख्य शहर व शहरालगत असणाऱ्या १० गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांसाठी १ डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान हि स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे या स्पर्धेत अनेक आशा सेविकांनी सहभाग घेवून आप आपल्या आरोग्य केंद्रातील हाॅलमध्ये टिबी व एचआयव्ही या विषयावर आजारा संबंधित सुबक अशा रांगोळीचे रेखाटन करून आपला सहभाग नोंदवला.आशा सेविका घरोघरी जाऊन एचआयव्ही आणि टीबीसह अनेक आजाराबाबत रूग्णांच्या समस्या जावून घेत योग्य वेळी योग्य निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांमुळे यावर नियंत्रण मिळवत बरे होता येते याबाबत रूग्णांचा आत्मविश्वास वाढवतात म्हणून अशा आशा सेविकांसाठी हि प्रबोधनात्मक रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ जेसिका अँड्रयुस , मनोबल प्रकल्प लिंक वर्कर सौ. निता पाटील , संस्थेचे जिल्हा प्रोजेक्ट अधिकारी अमोल माने , प्रियांका भोसले , सुपरवाझर स्नेहा कांबळे व स्टाफ सीमा पाटील यांच्यासह आशा सेविका व कर्मचारी उपस्थित होते.