शिरोली पुलाची येथील मदरसा जवळील वळणावर कारची डिव्हायडरला धडक वयोवृद्ध कार चालक जखमी 

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पुलाची येथील मदरसा जवळील वळणावर कारची डिव्हायडरला धडक बसून झालेल्या अपघातात वयोवृद्ध कार चालक किरकोळ जखमी झाला . या धडकेत कारच्या सहा ऐअर बॅग ओपन झाल्या यात कारचे मोठे नुकसान झाले हा अपघात सायंकाळी ४:३० वाजता झाला. अधिक माहिती अशी कि पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी वहातुक सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली आहे अशी वाहतूक शिरोली पुलाची येथील मदर्सा पासून वळवण्यासाठी रस्त्यावर सिमेंटचे मोठे डिव्हायडर ठेवून वाहतूक वळवण्यात आली याचा अंदाज वयोवृद्ध इब्राहिम अमिरहमजा पुणेकर ( वय 72 रा कदमवाडी कोल्हापूर ) याना आला नसल्याने कार( क्रमांक एम एच ०९ एफ पी ८०९१) सरळ १०० ते १२० च्या स्पीडने डिव्हायडरवर जावून धडकली यामध्ये कारच्या सहा ऐअर बॅग ओपन झाल्या त्यामुळे पुणेकर किरकोळ जखमी झाले त्याना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले .पुणेकर हे कोल्हापूरहून नागाव फाटा येथे असणाऱ्या किरण ऑटो या आपल्या दुकानाकडे येत असताना हा अपघात झाला अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती . या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती .

Leave a Comment

error: Content is protected !!