पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथे काजूचे टरफल घेवून पुण्याकडे चाललेला ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहाटे ४ वाजण्यासुमार पल्टी झाला . या अपघातात कोणती जीवित हानी झाली नाही पण वहातुक कोंडी होऊन लांबचलाब रांगा लागल्या होत्या . ट्रक सरळ करण्यासाठी दोन क्रेन बोलावण्यात आल्या. अधिक माहिती अशी की कागल तालुक्यातील हमिदवाड येथील फुड फॅक्टरीतून काजूचे टरफल घेवून पुणे चाकणकडे निघालेला ट्रक आज पहाटे ४ वाजण्यासुमार टोप येथे आला असता चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक ओढ्यावरील कटड्याला धडकून ट्रक थोड्या अंतरावर जावून पल्टी झाला . या अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलिस व हायवे पोलिस घटनास्थळी धाव घेवून परिस्थीतीची पहाणी करून ट्रक दोन क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचा प्रयत्न करत असताना ट्रक ओरलोड असल्याने दोन्ही क्रेनचे वायरूप तुटले त्यामुळे ट्रक सरळ करण्यास वेळ लागत असल्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण झाली होती वाहतूक नियंत्रित आणण्यासाठी शिरोली पोलिस व हायवे पोलिस शर्यतीचे प्रयत्न करून वाहतुक सुरळीत चालू केली