शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास साधण्याबरोबरच तरुण व महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी शहरातील जनतेने विश्वासाने शिरोळ नगरपालिकेची सत्ता आमच्या हाती दिली आहे.शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवताना जनतेच्या विश्वासाला पात्र राहून शहराचा विकास साधला जाईल,असा विश्वास यादव पॅनेलचे प्रमुख व नगरसेवक पृथ्वीराजसिंह यादव यांनी व्यक्त केला.येथील श्रीराम मंडळाच्या वतीने शिरोळ नगरपालिकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा शुक्रवारी रात्री श्रीराम मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव बोलत होते.या प्रसंगी शिरोळ नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ.योगिता कांबळे यांच्यासह नगरसेवक पृथ्वीराजसिंह यादव, सौ.अनिता संकपाळ,उल्हास आवळे, राहुल कोळी, विजय आरगे, सौ.श्वेता जाधव, सौ. सविता पुजारी, सौ. रेखा कोरे, शरद उर्फ बापू मोरे, सौ.दिपाली फल्ले, दीपक भाट, सौ. कल्पना काळे, सौ.अनुराधा गुरव, सौ. सुवर्णा कांबळे, ओंकार माने-गावडे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच यादव पॅनेलचे नेते माजी सरपंच अविनाश कांबळे, माजी नगरसेवक पंडित काळे, आनंदराव माने देशमुख, नेताजी जाधव, रावसाहेब माने,पद्मसिंह पाटील, चंद्रकांत भाट, मन्सूर शेख, बबन पुजारी, विवेक फल्ले, शक्तीजीत गुरव, संतोष जाधव आदी मान्यवरांचाही यावेळी गौरव करण्यात आला.सत्कार समारंभानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून श्रीराम मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहाच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.या वेळी नगराध्यक्षा सौ.योगिता कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा,रस्ते,आरोग्य व महिला सक्षमीकरण यावर विशेष भर देण्यात येईल. नगरसेविका सौ.दिपाली फल्ले व ओंकार माने-गावडे यांनीही शिरोळ शहराच्या विकासासाठी सर्व पदाधिकारी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक अक्षय इंगळे यांनी केले.या कार्यक्रमाला पंडित गावडे खातेदार, महादेव बिसूरे, पुंडलिक सूर्यवंशी, भरत माने, सिताराम शिंदे, दीपक गावडे, सागर पाटील, रवींद्र कदम, पांडुरंग इंगळे, बाळासो कदम, राजेंद्र बिसूरे, विठ्ठल इंगळे, शंकर कणसे, विष्णू मोरे, विश्वास दबडे, पोपट जाधव, बजरंग इंगळे, चंद्रकांत दबडे, विश्वास जाधव, रमेश गावडे, बाबुराव कणसे, आनंदराव गावडे, धीरज जाधव, प्रकाश इंगळे, दिनेश गावडे, शिवाजी कणसे, बाळासो गावडे, दत्तात्रय बिसूरे, योगेश गावडे, अक्षय उबाळे, प्रसाद गावडे, अक्षय कदम, रोहित बिसूरे, शुभम गावडे यांच्यासह श्रीराम मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.