पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील समता शिक्षण प्रसारक मंडळ शिरोली संचलित कै.रा.म. महाडिक हायस्कूल नवजीवन विद्यानिकेतन अंकुर विद्यालय या तिन्ही शाखांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन शिरोली लोक नियुक्त सरपंच पद्मजा करपे यांच्या हस्ते आणि आमदार अमल महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.खेळाडूंच्या शानदार संचलनाने स्पर्धांना सुरुवात झाली. यावेळी आ.अमल महाडिक आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच मैदानी खेळामध्ये ही मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन विशेष करियर म्हणून देखील खेळाकडे लक्ष द्यावे. असे मत आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केले.यावेळी शिरोली सरपंच पद्मजा करपे आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या क्रीडा उपक्रमांचे कौतुक करून त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. खेळातूनच देशाचा सशक्त नागरिक तयार होतो . महाडिक हायस्कूल क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून शिरोलीच्या नावलौकिकात भर घालील. असे मत सरपंच पद्मजा करपे यांनी व्यक्त केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कौंदाडे , बाबासाहेब गुरव , प्रशासन प्रमुख एस. डी. लाड, दिग्विजय कौंदाडे, धीरज पाटील, सागर कौंदाडे, ग्रा.प. सदस्या सौ. कमल कौंदाडे, ग्रा.प . सदस्या सौअनिता शिंदे , मुख्याध्यापिका शाहीन बागवान, सौ.प्राजक्ता ओउळकर, पर्यवेक्षिका प्रियांका लाड यांच्यासह सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.