प्राणीमित्रांचे कार्य महत्त्वाचे आणि कौतुकास्पद डॉ कापडी 

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (सॅप) कोल्हापूर या प्राणिकल्याण संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर परिसरातील तीस हून अधिक प्राणीमित्रांचा विशेष सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला, याप्रसंगी अध्यक्ष डॉ. सी आर कापडी यांनी प्राणिमित्रांचे कार्य महत्त्वाचे असून प्राण्यांच्या संरक्षणासाठी त्यांना क्लेशातून मुक्त करण्यासाठी सदर कार्य अत्यंत महत्त्वाचे व कौतुकास्पद आहे असे मत व्यक्त केले. सॅप च्या वतीने दर वर्षी प्रमाणे आयोजित कुत्रा व मांजर यांचे करता मोफत रेबीज प्रतीबंधक लस व जंत निर्मूलन शिबिराचे उद्घाटन प्रसंगी हा प्राणिमित्रांचा विशेष कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात शनिवार दि 27 रोजी 85 कुत्रा व 17 मांजरांना मोफत लस व जंत नाशक औषध देण्यात आले.शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या कार्याची ओळख उपाध्यक्ष प्रा. डॉ.अभिजीत पाटील यांनी करून दिली व ‘ माणूस म्हणून प्राण्यांबद्दल करूणा हीच प्राणी प्रेमाची भावना जपत ‘ संस्था विविध उपक्रम राबवत असते त्यामध्ये प्राणी मित्रांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. कारेक्रमाचे आभार सॅपचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ श्याम पाटील यांनी मानले.या प्रसंगी संस्थेचे जेष्ठ सभासद जयसिंग निंबाळकर,अभय दोशी, डॉ अजित शिंदे, अंजली तुंगतकर तसेच सॅप चे पशुवैद्य डॉ प्रदिप गौरवाडकर, डॉ भालचंद्र मस्कर, सचिव पूजा सावंत, रोहित जाधव, अजित हरणे, रॉबिन कदम व प्राणीप्रेमी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!