स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची मोठी कारवाई, ५ कोटीची व्हेल माशाची उल्टी जप्त 

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता साो यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी वेगवेगळी पथके तयार करून अवैध धंद्याविरुद्ध कारवाईचे सत्र सुरु ठेवले असताना आज रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अंमलदार परशुराम गुजरे यांना त्याचे गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, पुणे बेंगलोर हायवेलगत करवीर तालुक्यातील कणेरीवाडी, इथल्या विजयानंद पेट्रोलपंपाजवळ काही इसम प्रतिबंधीत व्हेल माशाची उल्टी (अंबरग्रीस) विक्री करीता घेवून येणार आहेत अशी बातमी मिळाली. त्या अनुषंगाने कारवाईसाठी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी शाखेकडील पोलीस उप निरीक्षक संतोष गळवे आणि पोलीस स्टाफ तसेच वन विभागाकडील आरएफओ नंदकुमार जगन्नाथ नलवडे आणि त्यांचेकडील स्टाफ अशांचे पथक तयार केले.सदर पथकाने प्राप्त बातमीनुसार पुणे ते बेंगलोर हायवेलगत कणेरवाडी, इथल्या विजयानंद पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला असता काही वेळाने दोन इसम चार चाकी गाडीतून व त्यांचे पाठोपाठ एक इसम मोपेड गाडीवरून पाठीला सॅक आडकवून येताना दिसला. पथकाला त्यांचा संशय आलेने पथक त्यांचे दिशेने जात असताना त्यांना पोलीसांची चाहुल लागताच ते आप आपले वाहनांनी विजयानंद पेट्रोल पंपांचे बाजूस असले साहेब हॉटेलकडे जाणारे कच्च्या रोडने आत पळून गेले.त्यांचा पथकाने पाठलाग करून त्यांना खानविलकरनगर इथल्या रिकाम्या जागेत पकडले.तेव्हा पंचांसमक्ष त्यांचे कब्ज्यातील सॅक उघडून पाहिली असता त्यामध्ये व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थ आढळून आला.तेव्हा वन विभागाचे पथकाने सदर पदार्थाची पडताळणी केली असता सदरचा पदार्थ हा व्हेल माशाची उल्टी (अंबरग्रीस) असलेचे खात्रीशीर सांगितले.त्यानंतर सदर इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपली नावे संभाजी श्रीपती पाटील वय 78, रा. चंद्रे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, प्रमोद उर्फ पिंटु शिवाजी देसाई वय 48, रा. चिक्कल वहाळ, ता. चिल्कोडी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक,अनिल तुकाराम महाडीक वय 55, रा. मुगळी, ता. गडहिंग्लज अशी असलेचे सांगितले. त्यांना सदरची व्हेल माशाची कोणाकडून आणली होती व कोणाला विक्री करणार होता याबाबत विचारणा केली असता त्यांनी व्हेल माशाची उल्टी विक्री करीता आणली असलेचे सांगितले.सदर इसमांचे झडतीमध्ये ५ कोटी २४ लाख ९० हजार रुपये किंमतीची ५ किलो २४९ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थ, एक मोपेड,एक कार व इतर असा एकूण ५ कोटी २८ लाख ६१ हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेने हस्तगत केलेला आहे. यातील आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी गोकुळ शिरगांव पोलीस ठाणेच्या ताब्यात दिलेला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता,अपर पोलीस अधीक्षक डॉ.बी.धीरजकुमार,अपर पोलीस अधीक्षक,आण्णासाहेब जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे,जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार परशुराम गुजरे, संतोष बरगे, सागर चौगले, योगेश गोसावी, पाटील, महेंद्र कौरवी, संजय हुंबे, समीर कांबळे, गजानन गुरव, विनायक चौगले, प्रदिप पाटील, कोरे, अरवींद पाटील, शिवानंद मठपती, सुशील पाटील यांचे पथकाने केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!