उपनगराध्यक्षपदावर संकपाळ,आरगे की अन्य कोण ?,पृथ्वीराजसिंह यादव यांच्या निर्णयाकडे लक्ष

Spread the love

शिरोळ उपनगराध्यक्षपदासाठी राजकीय खलबते सुरू

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदावरून शहरात राजकीय खलबते जोर धरल्या आहेत.नगर परिषदेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीला पराभूत करत शिव – शाहू पुरस्कृत यादव पॅनलने नगराध्यक्षसह १५ नगरसेवक विजयी झाल्यामुळे शिरोळ नगर परिषदेवर यादव पॅनलची एकहाती सत्ता स्थिर झाली आहे.या यशानंतर आता उपनगराध्यक्षपदावर कोणाला संधी मिळणार याबाबत मतभेद आणि चर्चा जोर धरली आहेत.नगर परिषदेतील राजकीय वर्तुळांमध्ये उपनगराध्यक्षपदासाठी सौ अनिता संकपाळ व विजय आरगे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे सूत्राकडून समजते आहे.पॅनलने निष्ठावंतांना संधी दिली जाईल की,अनुभव आणि राजकीय परिपक्वतेच्या आधारे निर्णय होईल? शहरातील नागरिकांचे लक्ष आता पॅनलचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांच्या निर्णयाकडे लागले आहे.शिरोळ शहरातील नागरिकात उपनगराध्यक्षपदावर कोणाची निवड होणार,याची उत्सुकता लागून राहिली आहे.यादव पॅनलने नगरपरिषदेवर पूर्ण बहुमत मिळवले असल्याने उपनगराध्यक्षपदावर घेतला जाणारा निर्णय पॅनलच्या भविष्यातील राजकीय धोरणांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.स्थानिक राजकीय तज्ज्ञांच्या मते, उपनगराध्यक्षपदावर निष्ठावंत सदस्याला संधी दिल्यास पॅनलची अखंडता आणि स्थिरता वाढेल.मात्र,काही भागात अनुभव असलेल्या आणि प्रशासनिक कामकाजात पारंगत असलेल्या उमेदवारांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे पॅनलचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांनी घेतलेला अंतिम निर्णय शिरोळच्या राजकीय वातावरणावर मोठा परिणाम करणार आहे.शिरोळ शहरातील राजकीय वातावरणात या निर्णयाचे प्रत्यक्ष परिणाम लवकरच दिसून येतील.त्यामुळं उपनगराध्यक्षपदावर संकपाळ, आरगे की अन्य कोणाची निवड होणार या शिरोळ नगर परिषदेतील राजकीय घडामोडींवर नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!