नागाव फाटा येथे क्रेन अंगावर पल्टी झाल्याने परप्रांतीय कामगार ठार 

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नागाव फाटा येथील स्टील यार्ड कंपनीत लोखंडी प्लेटा उचलणारी क्रेन अंगावर पल्टी होऊन परप्रांतीय कामगार ठार हि घटना दुपारी एक वाजण्यासुमार घडली .ठार झालेल्या परप्रांतीयांचे राशीद जलील खान वय ३८ मुळ गाव गोरखपुर जिल्हा महाराजगंज उत्तरप्रदेश आहे .घटनास्थळावरून पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी कि नागाव फाटा येथील प्रितम स्टील या कंपनीत काम करत होता बाहेरून स्टील ( लोखंडी ) प्लेटा घेवून आलेल्या ट्रेलर ( क्र.आर जे १४ जी एल ८६२९ ) मधून क्रेनच्या मदतीने या प्लेटा खाली उतरवण्याचे काम सुरू होते . हे काम सुरू करत असताना राशिद हा ट्रेलरवर जावून प्लेटा वायरूपच्या साह्याने बांधून क्रेन चालकाला जिथे ठेवायच्या आहेत ति जागा दाखवत होता पण अचानक क्रेनला प्लेटाचे ओव्हर लोड वजन झाल्याने क्रेन पलटी होऊन त्यामध्ये राशिद हा क्रेन खाली सापडल्याने त्याचा कंबरे खालील भागास गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला त्याला उपचारासाठी कोल्हापूरातील खाजगी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला .या अपघाताची माहीती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेवून अपघाताची माहिती घेत असताना येथील कर्मचाऱ्यांकडून ही प्रायव्हेट मालमता आहे येथे येण्यास मज्जाव केला व घडलेल्या घटनेचा पोलिसांकडून पंचनामा करण्या अगोदर परस्पर घटना लपवण्याच्या प्रयत्नात असताना वेळेत पोलिसानी घटनास्थळी धाव घेवून घडला प्रकाराची पहाणी करत कंपनी व्यवस्थापनाची चांगलीच कानउघाडणी केली . या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!