श्री दत्त कारखान्याला ‘कै.आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार’ जाहीर – गणपतराव पाटील 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) यांच्या वतीने दरवर्षी राज्यातील साखर कारखान्यांचे तांत्रिक आणि पर्यावरणीय कामगिरीच्या आधारावर पुरस्कार जाहीर केले जातात.यावर्षी श्री दत्त कारखान्यास कै. आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार २०२४ /२५ जाहीर करण्यात आला आहे.पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह,प्रशस्तीपत्र आणि रोख १ लाख रुपये आहे.सदर पुरस्कार सोमवारी, दिनांक २९ डिसेंबरला होणाऱ्या VSI च्या वार्षिक साधारण सभेत समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.श्री दत्त कारखान्याने पर्यावरण संवर्धनासाठी राबवलेल्या आधुनिक व अध्यायावत यंत्रणा,पाण्याचा काटकसरीने वापर, पाण्याचा पुनर्वापर, सांडपाण्याचा योग्य वापर व त्यातून होणारी मोठ्या प्रमाणातील पाणी बचत,तसेच सांडपाणी शून्य उत्सर्जनाची अंमलबजावणी या बाबींमुळे हा सन्मान कारखान्यास मिळाला आहे. कारखान्याने वृक्ष लागवड, माती संवर्धन,कारखाना परिसरातील हरित पट्टा जोपासणे,पर्यावरण संरक्षणासाठी विविध कामे राबवणे तसेच पर्यावरण व्यवस्थापनासाठी कुशल मनुष्यबळ राखणे या बाबीही पुरस्कारासाठी महत्वाच्या ठरल्या आहेत.श्री दत्त कारखान्याच्या मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी सांगितले की,हा पुरस्कार कारखान्याच्या नावलौकिकात महत्त्वाची भर घालणारा ठरला असून हा 69 वा पुरस्कार आहे.यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक,संचालक मंडळातील सदस्य कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील आणि खाते प्रमुख उपस्थित होते.या पुरस्कारामुळे कारखान्याच्या पर्यावरण संवर्धनातील प्रयत्नांची दखल घेण्यात आली असून,भविष्यातही कारखान्याचे पर्यावरणीय उपक्रम चालू राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!