निवृत्त मेजर सुभेदार विश्वास केरबा आवळे यांचे निधन

Spread the love

 शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ येथील निवृत्त मेजर सुभेदार विश्वास केरबा आवळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विश्वास आवळे यांनी भारतीय सैन्यात दीर्घकाळ सेवा बजावून देशसेवेत मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी,दोन भाऊ, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीप्रसंगी सांगली जिल्हा सैनिक संघटना,शिरोळ तालुक्यातील सर्व माजी सैनिक तसेच गावातील प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजी सैनिकांनी त्यांना मानवंदना देत श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Comment

error: Content is protected !!