पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
वसई विरार मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जेएसटीएआरसी बॅटल ग्राउंड तायक्वांडो चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या १९ खेळाडूंनी पुमसे व फाईट अशा दोन्ही प्रकारामध्ये एकूण ३६ पदके पटकावली त्यातील १५ सुवर्ण १२ रौप्य ६ कांस्यपदकाची कमाई करत या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकवण्याचा बहुमान मिळवला . या स्पर्धेमध्ये जेएसटीएआरसी कोल्हापूरला शिप्रा भूने, सई संकपाळ,श्लेषा शेळके, देव चव्हाण, यांनी पुमसे व फाईट अशा दोन्ही प्रकारांमध्ये प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावून दुहेरी सुवर्ण मुकुटाचे मानकरी ठरले या स्पर्धेत नील भोसले , मंजिरी शिंदे , मयुरेश शिंदे , श्लेषा शेळके , अमोघ अमृता , गोमती पाटील , सुमित्रा पाटील , सत्यकाम भोने , क्षिप्रा भोने , देव चव्हाण , स्पृहा दळवी , संकेत चौगले , तेजस नांबियार , अनूप रामचंद्रन , सई संकपाळ, जिया बगे , प्रचिती बिरंजे , श्रीहर्ष पुमसे , शंतनू भाटवडेकर या सर्वानी पुमसे फाईट यामध्ये सुवर्ण, रौप्य, कास्य पदकाची कमाई केली . या सर्वाना तायक्वांडो प्रशिक्षक अमोल प्रकाश भोसले यांचे प्रशिक्षण लाभले तर जीएसटीआरसी सीईओ ग्रँड मास्टर निलेश जालनावाला यांचे मार्गदर्शन लाभले .