पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पत्र्याच्या छतावरील साफसफाई करण्यासाठी गेलेल्या ७० वर्षीय वयोवृद्धाचा पडून मृत्यू झाला ही घटना सोमवारी दुपारी सांगली फाटा मार्बल लाईन येथील सेरा वर्ल्ड येथे घडली अधिक माहिती अशी कि कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर सांगली फाटा मार्बल लाईन येथील रामदेव बाबा मंदिरा शेजारी असणाऱ्या सेरा वर्ल्ड या मार्बल दुकानाच्या पत्र्याच्या शेडवर मयत अशोक चारू पाटील ( वय ७० रा. हालोंडी ता. हातकणंगले ) हे पडलेला कचरा काढून पत्र्याची साफ सफाई करण्यासाठी छतावर चढले असता जिर्ण झालेला पत्रा तुटला आणि ते छतावरून जमीनीवर पडून गंभीर जखमी झाले होते . कोल्हापूर येथील दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला . अशोक पाटील यांच्या मुलाचा ही मृत्यू काही वर्षांपूर्वी अपघातात झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी हालोंडी गावात कळताच गावावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सुन नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती