पद्मश्री वसंतदादा पाटील ऊस तोडणी,वाहतूक संस्थेच्या चेअरमन पदी जे.बी.पाटील यांची निवड

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे 

 

पद्मश्री वसंतदादा पाटील ऊस तोडणी व वाहतूक सहकारी संस्था लि. कसबा बावडा या संस्थेच्या चेअरमन पदी जयप्रकाश बापूसाहेब पाटील (जे. बी. पाटील) यांची एकमताने निवड करण्यात आली. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि. कसबा बावडा यांच्याशी सलग्न पद्मश्री वसंतदादा पाटील ऊस तोडणी व वाहतूक सहकारी संस्था मर्यादित कसबा बावडा या संस्थेच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली या बैठकीत सर्वानुमते हालोंडी ता. हातकणंगले येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जे. बी. ऊर्फ जयप्रकाश बापूसाहेब पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. या निवडी करीता जिल्ह्याचे नेते मा. आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अमल महाडिक या. चेअरमन दिलीप पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले. या निवडी बद्दल जे. बी. पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!