शिये येथे अवैद्यरित्या मावा बनवून विक्री करणाऱ्यावर कारवाई

Spread the love

३ हजाराचे मावा बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले .

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिये ता.करवीर येथील हनुमान नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ अवैद्यरित्या मावा बनवून विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून कारवाई केली त्याच्या कडून तिन हजाराचे मावा बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले .शिये हनुमान नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ आर के पान शॉप नावाची पान टपरी असून यामध्ये ऋतुराज शशिकांत कलकुटकी ( वय 21 वर्षे रा. वड्डु गल्ली भादोले ता. हातकणंगले ) हा अवैद्यरित्या सुगंधी तंबाखू,सुगंधी सुपारी व वेगवेगळ्या पत्यांचे मिश्रण तयार करुन त्याचा मावा बनवुन त्यावर कोणतेही लेबल न लावता अथवा त्याचेवर सुरक्षेबाबत कोणताही वैधानिक इशारा लिहीलेला नसताना विक्री करताना सापडला असून पोलिसांनी 1,200 /- रु. ची कातरुन बारीक केलेल्या सुपारीचे 1 किलोचे 2 पॅकेट, 1 पॅकेट 600/- रुपये प्रमाणे , 1,200/- रुपये त्यात सुंगधी तंबाखु 120 नंबरची सुमारे 1 किलोचे 1 पॅकेट, 1200/- रुपये प्रमाणे , 760/- रू.त्यात एकुण 38 माव्याच्या पुड्या, त्यामध्ये सुगंधी तंबाखु, चुन्याचे पाणी, सुपारीचे मिश्रण व वेगवेगळया पत्यांचे मिश्रण असलेली प्लास्टीक च्या कागदामध्ये गुंडाळलेल्या पुड्या प्रत्येकी 20/- रु मिळुन असे एकूण 3,160/ रुपयाचा मुददेमाल जप्त केला .पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून हाकेच्या अंतरावर कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून अशा प्रकारच्या अनेक कारवाई केल्या आहेत पण स्थानिक शिरोली एमआयडीसी पोलिसांना अशा प्रकारच्या कारवाई का करता येत नाही. याबाबत प्रश्न निर्माण होत आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!