पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथील बिरदेव मंदिराजवळील वळणावर भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने बुवाचे वाठार येथील विवाहीत तरूणी जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला असून जखमीस उपचारासाठी रूग्णालयात हा अपघात बुधवारी रात्री ९:३० वाजण्यासुमार घडला असून या अपघातात दिड वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावला, घटनास्थळावरून ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील ट्रकसह पलायन केले त्याचा पाठलाग करून पोलिसांनी कामेरी येथील पेट्रोल पंम्पावरून ताब्यात घेतला .मयत व्यक्तीचे नाव सोनाली शुभम कांबळे ( वय २६ रा बुवाचे वठार ता हातकणंगले ) तर जखमी मोहसीन पिंजारी याच्या डोक्यात , पायास गंभीर मार लागल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले तर या अपघातात सोनालीचा दिड वर्षाचा मुलगा सार्थक हा थोडक्यात बचावला . पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली अदिक माहिती अशी कि मयत सोनालीचे माहेर टेंबलाईवाडी कोल्हापूर असून सोनालीच्या मावशीने नवीन घर बांधल्याने या घराची वास्तुशांती असल्याने ती आठ दिवसापूर्वीच या कार्यक्रमास ती गेली होती कार्यक्रमास उरकल्याने बुधवारी रात्री पतीच्या आत्याचा मुलगा रोहण राजू कांबळे याची पत्नी व दिड वर्षाचा मुलगा सार्थक हे एकाच मोटरसायकलवर बुवाचे वाठार येथे जाण्यास निघाले पण वाटेत मोहसीन हा भेटल्याने त्याच्या गाडीवर सोनाली बसण्यासाठी टोप येथील बिरदेव मंदिराजवळील वळणावर पाठीमागून भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक एम एच १२ क्यु जी ८२१३ ने मोटरसायकल क्रमांक के ए २८ एच ई ८२४१ ला जोराची धडक दिल्याने सोनालीचा जागीच मृत्यू झाला तर मोहसीन हा गंभीर जखमी झाला पण मुलगा सार्थक हा रोहणच्या पत्नीजवळ असल्याने तो या अपघातातून थोडक्यात बचावला . शुभम हा पेठवडगाव येथील एका कापड दुकानात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना पत्नीच्या अपघाताती मुत्यूने त्यावर दुःखाचा डोंगर कोसळला . सोनाली व शुभमचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता मुलगा सार्थक याच्या जन्माने ते आनंदी होते सार्थक त्याचा पहिला वाढदिवस एप्रिल महिन्यात मोठ्या उत्साहात करण्यात आला होता नियतीने या अपघातात त्याचे मातृत्व हिरावून नेहून आईवाचून पोरके केले . या अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेत ट्रकचा पाठलाग करून त्यास कामेरी गावच्या हद्दीत असणाऱ्या पेट्रोल पंम्पावरून ताब्यात घेतले .या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरा झाली .