राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे कोल्हापूरात १४ डिसेंबरला वधू – वर मेळावा

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे 

सुखी संसाराची सुरुवात योग्य जोडीदाराच्या शोधातून होते.समाजातील तरुण-तरुणींना योग्य जीवनसाथी मिळावा, तसेच घटस्फोटीत, विधवा, विदुर,बिजवर यांनाही नव्या आयुष्याचा आधार मिळावा या उद्देशाने राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे जिल्हास्तरीय रेशीमगाठी वधू–वर व समाज मेळावा कोल्हापूरात आयोजित करण्यात आला आहे.हा भव्य मेळावा रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत शाहूपुरी येथील शाहू स्मारक भवन,दसरा चौक,कोल्हापूर येथे होणार आहे. या मेळाव्याला संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक कल्याण मंत्री श्री. बबनराव घोलप (नाना) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.मेळाव्यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील वधू–वर सहभाग नोंदवणार असून शेती,व्यवसाय,शिक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय,कायदा इत्यादी विविध क्षेत्रांतील पदवीधर उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. समाजातील सर्व स्तरांतील इच्छुकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.वधू–वरांच्या प्रत्यक्ष परिचयासाठी,निकषांच्या आधारे जुळवणीसाठी आणि परस्पर संवादासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विवाहाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासोबत एकाच समाजातील योग्य जोडीदार शोधण्याची ही उत्तम संधी असल्याचे आयोजकांनी सांगितले.या मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी दीपक राजाराम खांडेकर, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ, कोल्हापूर (मो.९८२३६५५४५४) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Comment

error: Content is protected !!