मौजे वडगाव नागरिकांना ५० % करवसुलीसमध्ये सवलत द्या

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत योजनेअंतर्गत मौजे वडगाव ता हातकणंगले गावातील नागरिकांना घरफाळा व अन्य करवसुलीसमध्ये  ५० टक्के सवलत देण्यासाठी उपसरपंच व ग्रामविकास अधिकार्याना संयुक्त ग्राम विकास आघाडी मार्फत निवेदन देण्यात आले.राज्यात राज्य सरकारने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे शासनाने गावच्या हितासाठी गावात अनेक योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत यात ५० % थकबाकीमध्ये कर सवलत देण्याचा निर्णय घेतला असताना मात्र ग्रामपंचायतीकडून स्वतःहून याबाबत घोषणा करून जनतेचे हित जपण्याचा प्रयत्न न करता जनतेला या लाभापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा सवाल माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महेंद्र कांबरे यानी ग्रामपंचायत प्रशासनास केला . आपण या निवेदनाचा विचार करून गावातील नागरिकांना सवलतीचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली . यावेळी उपसरपंच स्वप्निल चौगुले व ग्रामविकास अधिकारी भारती ठेंगे याना निवेदन देण्यात आले .यावेळी संयुक्त ग्राम विकास आघाडी वृषभ पाटील , सचिन चौगुले , महेश कांबरे ,संतोष लोंढे , शशिकांत तराळ , संतोष मोरे , संदीप खारेपाटणे , धनाजी लोंढे इत्यादीसह उपस्थित होते

Leave a Comment

error: Content is protected !!