पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
गडमुडशिंगी येथे श्री. धुळसिद्ध देवाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा अभूतपूर्व भाव भक्तीचा पिवळ्या रंगाच्या भंडाऱ्यात न्हाऊन निघाला. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश येथून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.येथे श्री. धुळसिद्ध देवाच्या जुन्या मूर्तीच्या जागी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना शास्त्रोक्त विधीने झाली.धनगरी ढोल, कैताळ, बासरी, कांबळेचे निशाण, छत्री, अब्दागिरी आणि धनगरी गज नृत्य अशा पारंपरिक मिरवणुकीने गावात जल्लोषाचे वातावरण पसरले होते.
चौकट
चार जेसीबींच्या सहाय्याने भंडारा व फुलांची मनोहर उधळण करण्यात आली. मार्गावर सजवलेल्या रांगोळ्या, पायघड्या आणि गावकऱ्यांचे नेत्र दिपवणारी होती.या कार्यक्रमास समस्त धनगर समाज,लोकप्रतिनिधी, पुजारी, ग्रामस्थ, भाविक यांनी मंदिर परिसर फुलून गेला होता. गांधीनगर पोलिस ठाण्याचे वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.ग्रामपंचायत गड मूड शिंगीचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी, मंदिर कमिटी यांचे सहकार्य लाभले.