पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
विसरण्याची सवय असल्याने नाव सांगता येत नाही
हेरले तून अण्णासो आमगोंडा पाटील बेपत्ता
हातकणंगले तालुक्यातील हेरले इथले 78 वर्षीय आण्णासो आमगोंडा पाटील हे दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजले पासून घरात कोणालाही न सांगता बाहेर निघून गेले आहेत. त्यांचा स्वभाव विसरभोळा असल्याने त्यांना नाव गाव सांगता येत नाही. मराठी कन्नड भाषा बोलता येते. त्यांची उंची पाच फूट चार इंच, रंग गोरा असून अंगामध्ये पांढरा शर्ट आणि चॉकलेटी पॅन्ट असून डोक्यावर गांधी टोपी आहे. ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा महावीर अण्णासो पाटील यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे. संबंधित फोटोतील दिलेल्या वर्णानुसार ही व्यक्ती कोणास आढळली तर हातकणंगले पोलीस ठाणे क्रमांक 0 230 2483132 या नंबर वर अथवा 9139161639 या मोबाईल नंबर वर संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे.