पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
कोल्हापूर जिल्हा यशवंत सेनेच्या वतीने यशवंतराव होळकर यांची २४९ वी जयंती बिरोबा मंदिर पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजेश तांबवे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय बर्गे व डॉ. विजय गावडे हे उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात तांबवे यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांचे देशासाठी असणारे योगदानपर भाषण करून आजची समाजाची दशा व दिशा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक वैद्यकीय विभागाचे अध्यक्ष डॉ संदीप हजारे यांनी केले,यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ विजय बर्गे यांनी समाज बांधवांनी या पुढील काळात समाज हीत लक्षात घेऊन एकोपा व एकजूट करणे काळाची गरज आहे असे मार्गदर्शन करताना होळकर शाहीचा इतिहास विस्तृतपणे मांडून मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास अहिल्यादेवी प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ लक्ष्मण करपे , डॉ विजय गोरड, विकास घागरे, यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय काळे, जिल्हाध्यक्ष तमा शिरोले, यशवंत सेना महिला जिल्हाध्यक्षा सौ ललिताताई पुजारी, कोल्हापूर शहर अध्यक्ष स्नेहाताई नलवडे , संजय पटकारे, सागर माने, समाधान हेगडे, संपत रूपने, जगन्नाथ माने, संदीप वळकुंजे, शाहीर संदीप वळकुंजे, नागाव चे गजानन हजारे, शिरोली गावचे ग्रामस्थ हरी पुजारी, दशरथ पुजारी,शिवराम हजारे, सागर पुजारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ समाज बांधव उपस्थित होते.आभार संजय काळे यांनी मानले