पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
येथील माऊली चषक कबड्डी स्पर्धेत शिवमुद्रा- कौलव या संघाने विजेतेपद पटकावले.तर जयहिंद मडळ, इचलकरजी हा संघ उपविजेता ठरला.तिसरा क्रमांक नवभारत शिरोली,तर चौथा क्रमांक राष्ट्रसेवक तळसदे यांना प्राप्त झाला.अंतिम सामना शिवमुद्रा,कौलव विरुद्ध जयहिंद मंडळ, इचलकरंजी यांच्यामध्ये होवून शिवमुद्रा कौलव या संघाने २९-२४ अशा पाच गुणाने विजेतेपद पटकावले.
अन्य बक्षिसे पुढीलप्रमाणे:-
उत्कृष्ठ पकड – यश शिंदे, जयहिंद मंडळ, इचलकरंजी.
उत्कृष्ठ चढाई – योगेश पाटील, नवभारत, शिरोली.
सर्वोत्कृष्ठ अष्टपैलू – साहिल पाटील, शिवमुद्रा कौलव.
मॅन ऑफ दि डे. सौरभ इंगळे, शिरोळ. दादासो पुजारी, शिवराय शिरोली. अभिषेक गुंगे, जयंत स्पोर्टस इश्वरपूर.
एकूण कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १६ संघानी सहभाग घेतला होता.
बक्षीस वितरण समारंभास कृष्णात करपे, बाळासाहेब पुजारी, बाजार समिती सभापती सुरेश पाटील, राजाराम साखर कारखाना संचालक दिलीप पाटील, प्रकाश कौंदाडे, योगेश खवरे,धनाजी पाटील,लखन घाटगे, नागनाथ गावडे,डॉ.सुभाष पाटील,उदय पाटील,राहूल अष्टेकर, राजेश पाटील,संपत संकपाळ, अशोक स्वामी, अनिल खोत,अशोक करपे, दिपक संकपाळ, सागर खटाळे, विनायक पाटील, सागर कौंदाडे,उदय कटाळे, विकास पाटील, विजय भोसले विनायक पाटील, श्रीधर परमाज ,साई कौंदाडे, यांचेसह पदाधिकारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.