हालोंडी येथे शेत जमिनीच्या वहिवाट रस्त्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी परस्परा विरुध्द गुन्हा दाखल 

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

हालोंडी येथे शेत जमिनीच्या वहिवाट रस्त्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी होवून तिघे जखमी अमोल गुंडा पाटील व संदिप शिवगोंडा पाटील यांनी परस्परां विरुध्द शिरोली पोलिसात गुन्हा दाखल . सामाईक वहिवाट रस्त्यांची न्यायालयात वाद सुरू असताना हा वाद उफाळून आला .पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी कि अमोल पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार हालोंडी ता हातकणंगले येथील गट नंबर ६३८ सामाईक क्षेत्रातून शेतात जाणाऱ्या वाटेवर नंदकुमार शिवगोंडा पाटील याने पाणी सोडल्याने पाणी वाटेवर का सोडले आहे असे विचारण्यास गेल्याने पाटील याने आम्हाला कोर्टाचा आदेश मान्य नाही. आम्ही पाणी सोडणारच. तुला काय करायचे ते कर,तुझा बापाचा रस्ता नाही असे म्हणत अमोल पाटील याला शिवीगाळ करत असताना अमोलचा भाऊ व पुतण्या तेथे येवून नंदकुमार यास समजावुन सांगत असताना त्यावेळेस धनपाल भाऊ पाटील , नंदकुमार शिवगोंडा पाटील , ऋतिक नंदकुमार पाटील ,. तन्मय नंदकुमार पाटील , अशोक अण्णा पाटील , बाळगोंडा भाऊ पाटील ,राजकुमार बाळगोंडा पाटील , सदिप शिवगोंडा पाटील , प्रशांत धनपाल पाटील , रोहन सुकुमार पाटील , अभिजीत अशोक पाटील , भाऊसो शिवगोंडा पाटील , राजवर्धन शिवगोंडा पाटील , माणिक बापु लिगाडे ,अभिषेक माणिक लिगाडे ,जीनगोडा शिवगोडा पाटील यानी भाऊ संतोष व पुतण्या अनिकेत पाटील यांना शिवीगाळ करत एकाला पण जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत नंदकुमार पाटील याने हातात असलेल्या विळ्याने अमोलच्या तोडावर मारुन जखमी केले तर सदिप शिवगोंडा पाटील याने हातातील फावड्याने पुतण्या अनिकेत याचे तोडांस मारले व जखमी केले या वादात संतोष पाटील याच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची चेन पडली असल्याचे फिर्यादीत सांगितले .तर संदिप शिवगोंडा पाटील याने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे कि गट न.६३८ सामाईक क्षेत्राचे वहीवाटी रस्त्यावरुन अमोल गुंडा पाटील, संतोष पाटील, व त्याचे वडील गुडां शिवगोंडा पाटील यानी हा रस्ता वहीवाटीचा असुन पाणी सोडण्यासाठी नाही असे म्हणुन मला शिवीगाळ करुन लागला म्हणुन मी त्यांना शिवीगाळ करु नको असे सांगत असताना, त्याने मला थांब तुला आता बघतोच असे म्हणुन अमोल याने मोबाईल वरुन आमचे गावातील सुकूमार घुमाई, सचिन सुकुमार घुमाई, बाळासा घुमाई, धन्यकुमार घुमाई, महावीर पाटील ( सोनुरे ) , अभिनव अनंतकुमार देसाई, रोहीत अरंविद कांबळे, अनिकेत सातगोंडा पाटील, सातगोंडा पाटील बोलावून त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली. त्यावेळी अमोल पाटील रागाने जावुन गुऱ्हाळावर लावलेला ट्रॅक्टर घेवून येत मी पाणी पाजत असले पाटामधुन घेवुन आला. मी त्याला आमचा ऊसाचे नुकसान होत आहे “तु ट्रॅक्टर बाहेर काढ ” असे सांगत असताना त्याने “तु मला कोण सांगणार, असे म्हणुन परत शिवीगाळ केली व मी आता तुम्हाला सोडत नाही असे जोरात ओरडत असताना आमचे भांडण सोडविण्याठी नंदकुमार पाटील, हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील, भाऊसाओ पाटील असे आले व त्यांना देखील शिवीगाळ करुन धमकी दिली आहे असे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे . दोन्ही गटाच्या एकूण २८ जणांनावर शिरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!