शिरोळ / प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक ८ मधील निवडणूक प्रचाराला विशेष गती मिळाली असून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रभागातील मतदारांशी संवाद साधत सौ.सारिका नरेंद्र माने यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. नरेंद्र माने यांनी अनेक वर्ष भाजप पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम केले असून, त्यांच्या सेवेला पक्ष सदैव मान देत आला आहे. त्यामुळेच त्यांच्या पत्नी सौ.सारिका माने यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी मतदारांपुढे व्यक्त केला.मतदार भेटीदरम्यान मंत्री पाटील म्हणाले की, सारिका माने विजय मिळाल्यानंतर केंद्र आणि राज्यातील सर्व शासकीय योजना प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत वेगाने आणि पारदर्शकपणे पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतील.नरेंद्र माने यांची संघटनातील दीर्घ सेवा आणि प्रामाणिक नेतृत्वगुण प्रभागाच्या विकासात मोठे योगदान देतील.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारदौऱ्याने प्रभाग क्रमांक ८ मधील निवडणुकीची समीकरणे अधिक रंगतदार झाली आहेत.स्थानिक नागरिक,महिला बचतगट,युवा मंडळे तसेच ज्येष्ठ मतदारांनीही मंत्र्यांच्या भेटीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अनेक मतदारांनी सारिका माने यांच्या उमेदवारीबाबत समाधान व्यक्त करत त्यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले. प्रचारदौऱ्यात मंत्री पाटील यांनी प्रभागातील मूलभूत सुविधांवरही चर्चा केली.पाणीपुरवठा,रस्ते,घनकचरा व्यवस्थापन, महिला सुरक्षितता तसेच युवकांसाठी रोजगार निर्मिती यासारख्या मुद्द्यांवर केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक निधी आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले.प्रभागाचा सर्वांगीण विकास हा आमचा मुख्य ध्येय आहे,असेही त्यांनी नमूद केले.दरम्यान,सारिका माने यांच्यासह भाजप पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक,कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने या दौऱ्यात सहभागी झाले होते.पाटील यांच्या उपस्थितीमुळे प्रभागातील वातावरण अधिक उत्साही झाले असून मतदारांचा कल सारिका माने यांच्या बाजूने स्पष्टपणे दिसत असल्याचे निरीक्षण राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.प्रभाग क्रमांक आठमध्ये आता प्रचार अधिक जोरदार होत असून आगामी निवडणुकीत सारिका नरेंद्र माने यांना मोठे मताधिक्य मिळेल,असा ठाम विश्वास भाजप कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.