प्रभाग ८ मधील युवक-महिलांना शासकीय योजनांचा माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कटीबद्ध – सौ सारिका माने 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

प्रभाग क्रमांक ८ मधील महिला व युवा वर्गामध्ये भाजप पक्षाशी एकनिष्ठ असणारे नरेंद्र माने यांच्याविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला असून त्यांच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.अनेक वर्षांपासून प्रभागातील सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत योजना पोहोचवण्याचे काम नरेंद्र माने सातत्याने करत असल्याने युवक व महिलांमध्ये त्यांच्याप्रती आपुलकी आणि विश्वास अधिक दृढ होत आहे.महिला बचतगट, स्वयंरोजगार, कौशल्यविकास, घरकुल, तसेच शिक्षणाशी संबंधित योजनांची माहिती देऊन प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी माने यांनी घेतलेल्या पुढाकाराचे सकारात्मक परिणाम आता प्रभागात दिसत आहेत.विशेषतः बेरोजगार युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे,नोकरी मेळावे व विविध प्रमाणपत्र कोर्सेसकडे त्यांचा विशेष कल असल्याने अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सूक्ष्म कर्ज,उद्योग विकास मार्गदर्शन, शिवणकला-अन्न प्रक्रिया यांसारख्या प्रशिक्षणांमध्येही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ च्या भाजप ताराराणी आघाडीच्या उमेदवार सौ.सारिका नरेंद्र माने यांनी मतदार भेटीदरम्यान नागरिकांशी संवाद साधला.यावेळी बोलताना त्यांनी प्रभागातील सर्वसामान्य कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ कोणत्याही अडथळ्याविना मिळावा यासाठी माने यांच्या माध्यमातून आतापर्यंत केलेले कार्य अधिक वेगाने पुढे नेण्याचे आश्वासन दिले.‘युवक व महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य देऊ.योजनांची माहिती,कागदपत्रे,मार्गदर्शन आणि प्रशिक्षण—या सर्व बाबींमध्ये आमचे दार नेहमीच खुले राहील,असे त्यांनी सांगितले.मतदारांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. प्रभागातील पायाभूत सुविधा,स्वच्छता, पाणीपुरवठा,रस्ते दुरुस्ती आणि सुरक्षाविषयक प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.नागरिकांनी यावेळी सारिका माने यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

Leave a Comment

error: Content is protected !!