पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील माऊली नागरी सहकारी पत संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन नवभारत क्रिडा मंडळाने २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत केले .या स्पर्धेत कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील निमंत्रित संघात होणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष लखन घाटगे यानी दिली.शिरोली पुलाची येथील माऊली नागरी सहकारी पत संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त गावात लोकमहोत्सवी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये कबड्डी,महिलांसाठी होम मिनिस्टर व अन्य खेळ ही घेतले जाणार आहेत २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर असे तिन दिवस ही कबड्डी स्पर्धा खेळवली जाणार आहे.यामध्ये स्पर्धेत कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील निमंत्रित संघाना बोलावण्यात आले आहे.स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी मोठी पाच हजार क्षमतेची बसण्यास गॅलरी करण्यात आली आहे . प्रथम क्रमांकाचे बक्षीस ४० हजार व चषक,द्वितीय क्रमांक ३० हजार व चषक,तृतीय क्रमांक १५ हजार व चषक , चतुर्थ १५ हजार व चषक प्रत्येक दिवसाचा मॅन ऑफ द डे आकर्षक भेट वस्तू व चषक व स्पर्धेत उत्कृष्ट चढाई , पकड,अष्टपैलु खेळाडूना आकर्षक भेट वस्तू व चषक हि स्पर्धा कोल्हापूर जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात येत आहे.यावेळी संस्थेचे चेअरमन बाबासाहेब बुधले,संस्थेचे संचालक व पदाधिकारी, नवभारत क्रिडा मंडळाचे अध्यक्ष लखन घाटगे,सागर कौंदाडे, साई कौंदाडे,सागर खटाळे, विकास पाटील यांच्यासह जिल्हा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.