हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगले नगरपंचायत प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार आणि समाजसेवी स्वप्निल सुभाष नरुटे यांचा “पहिला समाजकारण,मग राजकारण” या वृत्तीचा प्रत्यय आज दिसून आला.नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या आढावा बैठकीत खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत आज प्रभाग क्रमांक ३ च्या आढावा बैठकीदरम्यान शिरोळ तालुक्यातील एका व्यक्तीच्या अकस्मात निधनाचे वृत्त समोर आले.या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी स्वप्निल नरुटे यांना तातडीने उपस्थित राहण्याची गरज भासली. त्यांनी या बाबत त्वरित खासदार धैर्यशील माने यांना परिस्थितीची माहिती दिली. खासदार माने यांनी स्वप्निल नरुटे यांना सर्वतोपरी पाठबळ देत,पहिला प्राधान्य जनतेच्या सेवेला द्या,आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन दिले.या सहकार्यामुळे स्वप्निल नरुटे यांनी तत्काळ शिरोळला धाव घेऊन मृत व्यक्तीचे शवविच्छेदन केले.स्वप्निल नरुटे यांचे समाजकारण आणि राजकारणावरील दृष्टिकोन जनतेच्या हितासाठी प्रामुख्याने केंद्रित आहे.या वृत्तीमुळे प्रभाग क्रमांक ३ मध्ये त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे. नागरिकांनीही त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे स्वागत करत कौतुक व्यक्त केले आहे. उमेदवार म्हणून नाही तर माणूस म्हणून स्वप्निल नरुटे आपली खरी ओळख दाखवली असून संकटाच्या क्षणी त्यांनी दाखवलेली तत्परता आणि मानवतेवरील निष्ठा आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.हातकणंगले आणि शिरोळ तालुका क्षेत्रातील नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष मदतीसाठी तात्काळ धाव घेणाऱ्या उमेदवारांची ही वृत्ती समाजात नवा आदर्श निर्माण करत आहे.या घटनेमुळे स्वप्निल नरुटे यांचे मतदारांना दिलेले वचन फक्त शब्दात नाही तर कृतीतही दिसून येत आहे. उमेदवार आणि समाजसेवक या दोन्ही भूमिकेत संतुलित राहून लोकसेवेवर लक्ष केंद्रित करणारे स्वप्निल नरुटे प्रभाग क्रमांक तीनमध्ये जनतेच्या मनावर ठसा उमटवत आहेत. अशी प्रतिक्रिया प्रभागातील स्थानिक नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.