शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मध्ये चुरस वाढली असून शिव शाहू यादव पॅनेलच्या वतीने दिपाली विवेक फल्ले यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.यादव गटाशी एकनिष्ठ राहून आणि समाजातील सर्व घटकांशी स्नेहपूर्ण नातं राखत त्यांनी गेल्या काही वर्षांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोन दिवसात राजकीय समीकरणच बदलून टाकले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.दिपाली फल्ले या राजकारणात केवळ आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हे तर जनतेच्या प्रश्नांसाठी उतरल्याचे त्यांच्या प्रचारातून स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रभागातील रस्ते,पाणीपुरवठा,महिला बचतगटांचे प्रश्न,नागरिक सुविधा आणि स्वच्छता या मुद्द्यांची जाण असल्याने एक सक्षम नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.परिसरातील नागरिकांशी थेट भेटीगाठी घेत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.त्यामुळेच घराघरातून त्यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.शिव शाहू यादव पॅनेलचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात प्रचारात सहभागी होत असून प्रभागात शिस्तबद्ध आणि सकारात्मक प्रचार सुरू आहे. सौ.दिपाली फल्ले यांचा साधेपणा, लोकांशी मोकळेपणाने संवाद साधण्याची पद्धत आणि काम करण्याची तयारी यामुळे अनेक मतदार त्यांना आपल्या प्रभागासाठी योग्य पर्याय मानत आहेत.मी राजकारणात येण्यामागचा हेतू केवळ प्रभागातील समस्या सोडवणे हा आहे.माझ्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कटीबद्ध राहीन,असा विश्वास दिपाली फल्ले यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केला. युवकांपासून महिलांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. निवडणूक जवळ येत असताना प्रभाग ७ मध्ये वातावरण अधिक रंगतदार झाले आहे. मतदारांशी नाळ जुळवणाऱ्या आणि विकासाचा प्रामाणिक रोडमॅप मांडणाऱ्या दिपाली विवेक फल्ले या या निवडणुकीत महत्त्वाच्या स्पर्धक ठरत आहेत.जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग ७ मधील लढत अधिकच रोचक बनली आहे.