समाजात सन्मानाने उभे राहण्याची ताकद मिळवून देणाऱ्या शरद मोरे यांच्या पाठीशी मतदार 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

तरुणांच्या हाताला काम देत त्यांच्या कुटुंबांना सक्षम करण्याचे कार्य सातत्याने करणारे शरद उर्फ बापू मोरे यांना प्रभाग क्रमांक ७ सर्वसामान्य मतदारांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.समाजातील प्रत्येक घटकाला विश्वास देत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मोरे यांच्या पाठीशी प्रभागातील मतदार खंबीरपणे उभे राहत असल्याचे चित्र सध्या संपूर्ण परिसरात पाहायला मिळत आहे.मोरे यांनी गेल्या काही वर्षांत राजकीय पक्ष, गट–तट यांना न जुमानता शिरोळ शहरातील शेकडो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.रोजगार मिळाल्यानंतर या तरुणांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले असून अनेक कुटुंबे आज स्वाभिमानाने जगत आहेत.“एक मुलगा,एक पती,एक वडील” म्हणून समाजात सन्मानाने उभे राहण्याची ताकद मिळवून देणारे शरद उर्फ बापू मोरे हे तरुणांच्या मनातील आदराचे केंद्र बनले आहेत.निष्कलंक चारित्र्य,निस्वार्थी वृत्ती आणि कार्यक्षम नेतृत्वाची क्षमता या गुणांमुळे मोरे यांना प्रभाग क्रमांक ७ मधील मतदारांचा विश्वास अधिकाधिक दृढ होत चालला आहे. स्थानिक प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा,गरजूंसाठी मदतीचा हात आणि कोणत्याही अपेक्षेविना केलेली सामाजिक सेवा यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक ठळकपणे समोर येत आहे.यावेळी माता-भगिनींकडूनही मोरे यांना मोठ्या प्रमाणावर आशीर्वाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी त्यांनी राबवलेल्या उपक्रमांना मिळालेला प्रतिसाद विशेष उल्लेखनीय आहे.महिलांच्या अडचणी, सुरक्षेचे प्रश्न,त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेली मदत या सर्व बाबींमध्ये मोरे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे महिला वर्ग त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे.प्रभाग ७ मध्ये आगामी निवडणुकांची धामधूम वाढत असताना मतदारांचा कल मोरे यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास, तरुणांचा उत्साह आणि माता-भगिनींचे आशीर्वाद या तिन्ही गोष्टींच्या पाठबळावर शरद उर्फ बापू मोरे यांची उमेदवारी अधिक प्रभावी ठरत आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार मिळाल्याचा आनंद मतदार स्पष्टपणे व्यक्त करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!