शिरोळ नगर परिषद निवडणूक : प्रभाग क्र. ६ मधून शाहू कोळी यांच्या उमेदवारीला प्रभागातील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून प्रभाग क्रमांक सहा मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या शाहू सुकुमार कोळी यांच्या उमेदवारीला प्रभागातील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोणताही राजकीय वारसा मागे नसताना फक्त सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव याच्या जोरावर त्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.साध्या कुटुंबातून पुढे आलेले शाहू कोळी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमांतून कार्यरत आहेत. प्रभागातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते-दुरुस्ती,दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी, तरुणांसाठी उपलब्ध संधी या सर्व स्थानिक समस्यांवर काम करण्याची त्यांची तयारी आणि लोकांपर्यंत सहज पोहोचणारं व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांना प्रभागातील ‘आपला माणूस’ म्हणून ओळख मिळत आहे. निवडणूक जाहीर होताच कोळी यांनी घरदारी संपर्काला सुरुवात केली असून त्यांना प्रत्येक गल्लीबोळातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.आमच्यासाठी काम करणारा, आमच्या समस्या समजून घेणारा उमेदवार हवा अशी भावना अनेक मतदारांनी व्यक्त केली असून त्यातून प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नसतानाही त्यांचा प्रचार वेगाने पुढे जात आहे.शाहू कोळी यांनी नागरिकांशी संवाद साधताना प्रभागातील मूलभूत सुविधा सक्षम करण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.नगरपरिषद ही सामान्य माणसांच्या समस्यांवर उपाय करणारी सर्वात जवळची संस्था आहे. त्यामुळे विकासकामात पारदर्शकता आणि तातडीने निर्णयक्षमतेवर माझा भर असेल, असे ते म्हणाले.दरम्यान, प्रभाग क्रमांक सहामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निर्माण झालेल्या या समर्थक लाटेमुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न ओळखणारा आणि त्यासाठी झटणारा उमेदवार म्हणून शाहू कोळी यांची ओळख निर्माण होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!