शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांना वेग येऊ लागला असून विविध प्रभागांमध्ये प्रचाराची चुरस वाढत आहे.प्रभाग क्रमांक ४ मधून ताराराणी आघाडीच्या उमेदवार सौ.शारदा सुनील माने यांचा मतदारसंघातील दौरा अधिक गतीमान झाला आहे.प्रभागातील घराघरांत जाऊन मतदारांशी सुसंवाद साधत, प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन देत त्या जनतेशी आत्मीयता जपत आहेत. सौ.माने यांनी आपल्या प्रचारादरम्यान मतदारांना भावनिक आवाहन केले आहे.“एक मुलगी,सून, बहीण आणि सखी म्हणून माझ्या पाठीशी उभे राहा.मला आपल्या प्रभागाची सेवा करण्याची संधी द्या,”अशा शब्दांत त्यांनी मतदारांना थेट संवादातून विश्वास दिला.त्यांच्या या मनमिळावू भाषणशैलीने आणि साधी राहणीमानामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.प्रभाग ४ मधील अनेक विकासकामे मागील काही काळापासून प्रलंबित आहेत. गटारी,रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा,स्वच्छता,महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे आधी कामांना प्राधान्य देण्याचा आपला प्रथम प्रयत्न असल्याचे सौ.माने स्पष्टपणे सांगत आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासनिक पाठपुराव्यासोबत लोकसहभागही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी मतदारांना पटवून दिले.उमेदवार माने यांचा प्रचारात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग जाणवत असून युवकांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान त्यांना अनेक ठिकाणी नागरिकांकडून स्वागत होत आहे.अनेक मतदारांनी “शारदाताईंचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे”अशी प्रतिक्रिया दिली आहे.दरम्यान,ताराराणी आघाडीतर्फे प्रभाग ४ मध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष संपर्क मोहीम राबवली जात असून सौ.माने या प्रत्येक उपक्रमात स्वतः सक्रिय भूमिका निभावत आहेत.आगामी निवडणुकीत विकासाला प्राधान्य देणारा सक्षम आणि जबाबदार प्रतिनिधी म्हणून सौ.शारदा सुनील माने यांच्याकडे मतदारांचा कल वाढत असल्याचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे.त्यांच्या आवाहनाने आणि स्वभावाने निर्माण झालेला सकारात्मक प्रतिसाद निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावेल,अशी चर्चा प्रभागात सुरू झाली आहे.