शिरोळ नगरपरिषद निवडणुक ; दिलीपदादा पाटील गटामुळे राजर्षी शाहू विकास आघाडीची ताकत वाढली – अमरसिंह पाटील 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.या पार्श्वभूमीवर स्व.दिलीप दादा पाटील गटाने आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर आणि प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.या निर्णयामुळे आघाडीची ताकद वाढली आहे.समर्थन जाहीर करताना युवा नेते रणजितसिंह पाटील म्हणाले की,शिरोळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी स्व.दिलीप दादा पाटील यांची शिरोळ नगरपरिषद स्थापन करण्याची कल्पना होती.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अथक पाठपुरावा करून नगरपरिषद मंजूर केली.त्यांच्या स्वप्नातील शिरोळ उभारण्यासाठी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी मोठा निधी खेचून आणला आणि शिरोळच्या विकास साधला आहे. तसेच,स्व.दिलीप दादा पाटील यांच्या बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा सर्वच कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन राजर्षी शाहू विकास आघाडीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी बोलताना नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले,उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोळमध्ये कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणला आहे.सर्व समाजघटकांना विकासात्मक न्याय देण्यात आला.विरोधकांनी तक्रारी आणि अडथळे निर्माण करून गावच्या विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला,परंतु जनतेला सर्व माहिती आहे. स्व.दिलीप दादा पाटील गटाचा मिळालेला पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असून त्यामुळे आगामी निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान,गोकुळ दूध संघाच्या उभारणीत स्व.दिलीप दादा पाटील यांचे मोलाचे योगदान आहे.त्यामुळे आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीत रणजितसिंह पाटील यांना भक्कम पाठबळ देणार आहोत,गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीविषयी अमरसिंह पाटील यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली.या कार्यक्रमाला दिलीप दादा पाटील दिनदौलत सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब काळे,दत्त दूध संस्थेचे चेअरमन रामदास गावडे,नारायण काळे,व्हा.चेअरमन बाबुराव देशमुख, सेवा संस्थांचे चेअरमन सुभाष जाधव, शाहू विकास चेअरमन गजानन चव्हाण, दिलीप माने,दिलीप गावडे,दिलीप गाडगीळ, विजय पाटील कवठेकर,अरुण बेंद्रे,मोहन पडळकर,सुखदेव पुजारी, बाळासाहेब जावीर, राजू मोरे,चंद्रकांत पुजारी,गुंडा पुजारी,सुनील पाटील, अनिल देशमुख,किरण ताराप,अनिल काळे,भीमराव इंगळे,अमर गंगधर,ऋषी चव्हाण,नवनाथ कुंभार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!