शिरोळ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रतिष्ठेची लढत ठरणार 

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी 
शिरोळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण गटातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये आगामी निवडणुकीत प्रमुख लढत माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आणि बाबा पाटील यांचे पुतणे,माजी नगरसेवक पद्मसिंह पाटील यांच्यात होणार आहे.या प्रभागातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे कारण ही निवडणूक या प्रभागातील निवडणूक प्रतिष्ठेचे ठरू शकते.
यापूर्वी ताराराणी आघाडीचे उमेदवार शिवाजीराव माने – देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या प्रभागातील स्पर्धा आणखी लक्षवेधी ठरली आहे. शिवाजीराव माने – देशमुख यांच्या अर्ज मागे घेण्याने आता या प्रभागातील दोन प्रमुख गटात थेट संघर्ष होणार आहे.माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांना त्यांच्या अनुभवाचा फायदा असून, त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत विविध विकासकामे झाली आहेत,ज्याचा त्यांना मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.तर दुसरीकडे, प्रताप उर्फ बाबा पाटील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक असून त्यांची समाजातील स्वच्छ प्रतिमा व रोखठोक. भुमिका त्यांच्या प्रचार मोहिमेस बळ देत आहे.या पार्श्वभूमीवर मतदारांचा निर्णय या प्रभागात कोणत्या बाजूला झुकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.विशेषतः या प्रभागातील मतदार हे पारंपरिक गटापेक्षा व्यक्तिगत नेतृत्व आणि कार्यक्षमतेवर अधिक भर देतात.त्यामुळे मतदारांचे निर्णय आणि मतदानाचे प्रमाण या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते.शहरातील स्थानिक लोक आणि राजकीय कार्यकर्ते या प्रभागाकडे लक्ष ठेवून आहेत. आगामी निवडणुकीत कोणते चेहरे नगरपालिकेच्या नेतृत्वात येतील,हे ठरवणे प्रभाग क्रमांक ९ साठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.या पार्श्वभूमीवर मतदारांची उत्सुकता आणि राजकीय चर्चाही वाढत आहे.या प्रभागातील निवडणूक परिणाम फक्त व्यक्तींच्या प्रतिष्ठेची नव्हे, तर स्थानिक राजकीय संतुलनावरही परिणाम करणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Leave a Comment

error: Content is protected !!