शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.पहिल्या टप्प्यात हातकणंगले तालुक्यातील नागाव, टोप( भोसले मळा) येथे ऊसतोड मजुरांसाठी आरोग्य शिबीर संपन्न झाले.या शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली यांच्या वतीने करण्यात आले होते.या शिबिरात बाहेरून ऊस तोडी साठी आलेल्या मजुरांचे सर्वेक्षण करून बुधवारी सायंकाळी ६ ते ८ या दरम्यान त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यामध्ये बीपी,शुगर,ईसीजी, सोनोग्राफी ,एक्स रे आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच गरोदर माता व बालकांची कुष्ठरोग तपासणी करण्यात आली व सर्वाना औषधोपचार करण्यात आले.या शिबिरात एकूण ६८ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये चार गरोदर महिलांचा व ० ते ५ वयोगटातील लहान १७ मुलांचा समावेश आहे.यामध्ये गरोदर महिलेची सोनोग्राफी करून त्या महिलेस १०८ रुग्णवाहिकेतून चालक सरदार पाटील यांनी आणून परत सोडले.या मोहिमेस वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्रयुस, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दाभाडे,आरोग्य सहाय्यक गायकवाड, आरोग्य सेवक विकास गोसावी,आरोग्य सेविका श्रीमती सीमा साठे, सरदार पाटील व सर्व आशा स्वंयसेवीका उपस्थित होत्या.

Leave a Comment

error: Content is protected !!