पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
शालेय विद्यार्थ्यांनी मन ,मनगट आणि मेंदूचा विकास करणाऱ्या खेळात स्वतःचे करियर घडवावे असे प्रतिपादन शिरोली एम आय डी सी चे स पो नी सुनील गायकवाड यांनी शिरोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणविस्तार अधिकारी पांडुरंग शिलेदार होते.स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलीत करण्यात आले.जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेअंतर्गत नागाव केंद्रांतर्गत शिरोली ,नागाव, टोप, संभापुर, कासारवाडी येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धांमध्ये कबड्डी, खो खो धावणे, कुस्ती, गोळा फेक थाळी फेक आदी क्रीडा प्रकारांचा समावेशय आहे या वेळी शिरोलीच्या लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे शिक्षणविस्तार अधिकारी पांडुरंग शिलेदार यांनी मनोगत केले .या वेळी केंद्र प्रमुख कृष्णात पाटील मुख्याध्यापक प्रतापराव शिंदे, प्रकाश लोहार, जनार्दन कुंभार, संदीप कोरवी, गोरखनाथ पाटील,अंजना संकपाळ, रजनी पाटील,अनिता कुंभार, दत्तात्रय गायकवाड, नईम अत्तार, राजश्री जाधव, मारुती पाटील, बाळासो आळतेकर, नईम अत्तार, मलकारी आरगे,भाग्यश्री सोडगे, यांच्यासह क्रीडा शिक्षक, संघव्यवस्थापक शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचलन संजय जाधव यांनी केले .