मी पदासाठी नाही,तर विकासकामासाठी लढते आहे सौ.करुणा कांबळे यांचे भावनिक आवाहन

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार होत असताना, आरक्षण अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गात जाहीर झाल्यानंतर माजी उपनगराध्यक्षा सौ.करुणा जनार्दन कांबळे यांनी मतदारांना भावनिक आवाहन करत आपल्या उमेदवारीची जोरदार तयारी सुरू केली आहे.मागील पाच वर्षांतील आपल्या कामगिरीचा आढावा घेत,पुन्हा एकदा विकासाची गती वाढवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी शिरोळकर जनतेला दिला आहे.तुम्ही दिलेला विश्वास माझं बळ आहे.मी पदासाठी नाही,तर कामासाठी लढते आहे अशा शब्दांत सौ.करुणा कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.नगरसेविका, उपनगराध्यक्ष तसेच आरोग्य,स्वच्छता, वैद्यक आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदांवर काम करताना शिरोळ शहरात रस्ते,गटारी, पाण्याच्या टाक्या,स्वच्छता उपक्रम, महिलांसाठी विविध कार्यक्रम अशा अनेक विकासकामांना गती दिल्याचे त्या म्हणाल्या नगराध्यक्षपद महिला अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर ही फक्त वैयक्तिक संधी नसून शिरोळच्या सर्वांगीण विकासाचे नवे पान उघडण्याची ही वेळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महिलांना आत्मनिर्भर बनवणे,प्रत्येक कुटुंबापर्यंत विकासाची उजळण पोहोचवणे आणि शहराला एक आदर्श नगरपरिषद म्हणून घडवणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.शिरोळला महाराष्ट्रात आदर्श नगरपरिषद म्हणून उभे करण्यासाठी सर्वपक्षीय आणि सर्वसमावेशक सहकार्याची गरज असल्याचेही त्यांनी मतदारांना उद्देशून म्हटले.“चला,एकत्र येऊया,शिरोळला आदर्श बनवूया”तुमचं प्रेम,तुमचा विश्वास आणि तुमचं मत हेच माझं खरं बलस्थान आहे,असे आवाहन करत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी जनसंपर्क मोहीम अधिक गतीमान केली आहे.करुणा कांबळे यांच्या या भावनिक आवाहनाला शिरोळ परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही दिसून येत असून,आगामी नगराध्यक्षपदाची निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!