यड्राव–कोंडीग्रे मार्गावर ट्रक मोटरसायकल अपघात; बुबनाळचे चंद्रकांत किनिंगे यांचा मृत्यू

Spread the love

यड्राव / प्रतिनिधी 

यड्राव कोंडीग्रे मार्गावरील वळणावर आज शुक्रवार, 21 नोव्हेंबर सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. चंद्रकांत सुरेंद्र किनिंगे (वय 55, रा.बुबनाळ ता. शिरोळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सिमेंटच्या पोत्यांनी भरलेल्या ओव्हरलोड ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.चंद्रकांत किनिंगे हे पार्वती औद्योगिक वसाहत कार्यालयातील कर्मचारी असून,दिवसभराचे काम आटोपून ते घरी जात होते. ते मोटरसायकल क्रमांक MH 09 EE 6438 वरून बेगर वसाहत रस्त्याने जात असताना वळणावर सिमेंट पोत्यांनी भरलेला ट्रक क्रमांक KA 48 A 1435 वळण घेत होता. यावेळी ट्रकची मोटरसायकलला जोरदार धडक बसली.धडक एवढी भीषण होती की चंद्रकांत यांचा मृत्यू घटनास्थळावरच झाला.हेल्मेट फुटून गंभीर दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.अपघातानंतर संबंधित ट्रक चालक ट्रक जागेवर सोडून पळून गेला आहे.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.घटनास्थळी शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मनोज मोहिते,अविनाश मुंगसे,हवालदार सतीश कांबळे व पो.ना. गजानन कोष्टी यांनी पंचनामा करून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली.मृतदेह इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.ट्रक चालकाचा शोध सुरू असून शहापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू आहे.या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!