पुलाची शिरोली येथे प्राणघातक हत्याराने हल्ला करणाऱ्या काढली धिंड

Spread the love

पुलाची शिरोली येथे दांपत्यासह मुलावरही ऐडक्यासारख्या प्राणघातक हत्याराने हल्ला करणाऱ्या चौघांची पाच दिवसाची पोलिस कोठडी व माळवाडी ते शिरोली फाटा पर्यंत धिंड काढण्यात आली.

 

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

 

पुलाची शिरोली येथील कोरगावकर कॉलनी परिसरात मंगळवारी रात्री पुर्व वैमनस्यातून दांपत्यासह मुलावरही ऐडक्यासारख्या घातक हत्याराने हल्ला करणाऱ्या चौघांची गुरूवारी सायंकाळी धिंड काढण्यात आली. या चार आरोपींना वडगांव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता त्याना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली . . घटनेदिवशी चौघांनीही हातात धारदार एडके हातात घेवून दहशतवाद माजवत कांबळे कुटुंबावर प्राण घातक हल्ला केला होता.पुलाची शिरोली येथील विलास नगर परिसरात मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेवन करून शतपावली करण्यासाठी गेलेल्या कांबळे दांपत्यावर वैभव राजू बेडेकर (वय 25 रा लालबहादूर हौसिंग सोसायटी, माळवाडी शिरोली पुलाची ता.हातकणंगले ) ,आर्यन अनिल शिंदे ( वय 18 ) , साहिल अरुण बनगे( वय 22 ) , साहिल उर्फ गणेश चंद्रकांत शिद्रुक (वय 21 रा. सावंत कॉलनी, माळवाडी, शिरोली पुलाची ता. हातकणंगले ) या चौघांनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या हल्ल्यात दिगंबर याच्या डोक्यास , हातावर वार केल्याने त्याची बोटे तुटली होती. तर त्याची पत्नी आरती कांबळे ही जखमी झाली होती तर मुलगा वल्लभ या हल्ल्यातून बचावला होता. या हल्ला नंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन झाले होते. शिरोली पोलिसांनी बुधवारी कागल येथे त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.आज गुरुवारी वडगांव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची सोमवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी या चार हल्लेखोर आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले व चौकशी करत त्यांनी ज्या परीसरात हातात ऐडके घेऊन दहशत निर्माण केली व कांबळे दांपत्यावर खुनी हल्ला चढवला त्याच परिसरात त्यांच्या हाताला दोरी बांधून फिरवत धिंड काढली. या वेळी रस्त्यावर या परीसरातील आबाल वृध्द नागरिक मोठ्या संख्येने जमले होते..

Leave a Comment

error: Content is protected !!