आळते पं स गणात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे : बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी 

आळते (ता. हातकणंगले) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडला. अध्यक्षीय मनोगतात बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की,स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी,यासाठी पक्ष पातळीवर गंभीर चर्चा सुरू आहेत.पक्षवाढीसाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रमुख भूमिका देण्याचा प्रयत्न सुरू आहे.पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत जिल्हा उपाध्यक्ष संदीप आळतेकर यांना पक्षाकडून भक्कम पाठबळ देण्याची घोषणा करताना त्यांनी आळते पंचायत गणात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे,असे आवाहन केले. पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने स्वीकारावी, असेही ते म्हणाले.सरकारच्या कामकाजाचा उल्लेख करताना पाटील यांनी महायुती सरकारने विविध लोकाभिमुख योजना घराघरांत पोहोचवल्याचे सांगितले. येत्या काळातही सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून विकासाभिमुख निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.मेळाव्यास हातकणंगले विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर, तालुका अध्यक्ष संभाजी पवार, जिल्हा उपाध्यक्ष संदीप आळतेकर, तसेच शिरीष देसाई, अमित खोत, विरभद्र गुरव, राम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक असगर मुजावर यांनी केले.कार्यकर्ता मेळाव्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून संघटन मजबूत करण्याची प्रक्रिया गतीने सुरू झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Leave a Comment

error: Content is protected !!