शिरोळ | प्रतिनिधी
शिरोळ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधून सौ.शुभांगी निळकंठ फल्ले यांना ज्येष्ठ तसेच तरुण मतदारांकडून मिळत असलेला वाढता प्रतिसाद विशेषत्वाने लक्ष वेधून घेत आहे. प्रभागातील विविध भागांत होत असलेल्या संपर्क दौऱ्यांदरम्यान मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास आणि त्यांना मिळणारे उत्स्फूर्त स्वागत यामुळे प्रभागातील राजकीय वातावरण रंगतदार झाले आहे.ग्रामपंचायत कार्यकाळात करण्यात आलेल्या विकासकामांचा ठसा,प्रशासनातील त्यांच्या कार्यकौशल्याचा अनुभव आणि कुटुंबाचा असलेला राजकीय वारसा या तिहेरी बळावर सौ.फल्ले प्रभाग सातमध्ये मजबूत पाय रोवू पाहत असल्याचे दिसून येत आहे.स्थानिक पातळीवरील गरजांवर त्यांच्या लक्ष केंद्रीत दृष्टिकोनामुळे विविध सामाजिक घटकांकडून त्यांना प्रतिसाद मिळत असल्याचे मतदारांनी सांगितले. दरम्यान,सौ.फल्ले यांच्या प्रचारात त्यांचे पती निळकंठ फल्ले यांची महत्त्वपूर्ण भूमिका दिसून येत आहे.अनेक वर्षांपासूनचा त्यांचा जनसंपर्क,शांत व संतुलित स्वभाव तसेच निस्वार्थी व्यक्तिमत्वामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.या दोघांच्या कार्यशैलीमुळे प्रभागातील अनेक तरुण मतदार देखील त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे.प्रभागातील ज्येष्ठ मतदारांनीही शुभांगी फल्ले यांच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे. स्थानिक समस्यांची जाण,महिला नेतृत्वातून विकासाला गती देण्याची क्षमता आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन या गुणांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.एकूणच,प्रभाग क्रमांक ७ मध्ये सौ. शुभांगी फल्ले यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता पाठिंबा आगामी स्थानिक राजकारणाला नवी दिशा देणारा ठरू शकतो,अशी चर्चा सध्या प्रभागात रंगताना दिसत आहे.