पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोलीत गणपती विसर्जन मिरवणूकीत झालेल्या किरकोळ वादाचा राग धरुन दिगंबर रघुनाथ कांबळे (वय.४४.रा.सावंत काॅलनी, शिरोली) या तरुणावर आणि त्याच्या पत्नीवर चौघांनी ऐडक्यांनी वार केले. ही घटना मंगळवारी रात्री १० च्या सुमारास कोरगावकर कॉलनी मुख्य रस्त्यावर झाली.
यात कांबळे याची डाव्या हाताची बोट तुटली असून दोन्ही हाताला आणि डोक्यात गंभीर जखम झाली आहे.
गंभीर हल्ल्यात झाले आहे. मंगळवारी रात्री अंदाजे दहा वाजण्याच्या सुमारास कोरगावकर कॉलनी मुख्य रस्त्यावर दिगंबर रघुनाथ कांबळे (वय 44, रा. सावंत कॉलनी) यांच्यावर वैभव बेडेकर, साहिल बनगे (रा.आंबेडकर चौक), गणेश शिदरुक (रा.सावंत काॅलनी), आणि एक अनोळखी या चौघांनी ऐडक्याने वार करून जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नीवरही आरोपींनी वार केले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून जखमी कांबळे यांनी सांगितलेली अधिक माहिती अशी दोन महिन्यांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणूकीत कांबळे आणि बेडेकर यांच्यात किरकोळ वाद झाला होता. हा वाद गावातील नेते मंडळींनी मिटविला होता.
कांबळे हे मंगळवारी रात्री ९.३० वाजता जेवण करून आपल्या पत्नी आणि मुलाला सोबत घेऊन फिरण्यासाठी गेले होते. याच वेळी बेडेकर आपल्या तीन साथीदारांसह चारचाकी गाडीतून आला आणि कांबळे याच्यावर तुला संपवतो ठेवतच नाही असे म्हणून चौघांनी ऐडक्याने सपासप वार केले यात कांबळे याला डाव्या हाताची बोटं तुटली आहेत दोन्ही हातावर आणि डोक्यावर वार केले आहेत. कांबळे यांच्या पत्नी आडव्या पडल्याने त्यांना ही लागले आहे. शेजारी सुरु असलेले झेराॅक्स सेंटर मधये कांबळे घुसले आणि शटर ओढल्या मुळे कांबळे वाचले. ऐडक्याने वार करुन बेडेकर सह तिघेजण फरार झाले आहेत. जखमी कांबळे याच्यावर शिरोली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनास्थळी पोलीसांनी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. शिरोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचं काम सुरू होतं. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.गणपती उत्सवादरम्यान झालेला वाद इतका उग्र होईल, याची स्थानिकांना कल्पनाही नव्हती. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.