शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रभाग क्रमांक १ मध्ये राजकीय समीकरणांना वेग आला आहे.प्रभाग क्रमांक १ मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवार म्हणून सौ शैलजा विजय पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.रत्नाप्पाण्णा कुंभार गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभावी राजकीय वारसा असून,या भागात त्या मजबूत उमेदवार म्हणून समोर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.स्वर्गीय एल.के.पाटील हे शिरोळ पंचायत समितीचे दीर्घकाळ उपसभापती म्हणून कार्यरत होते.त्यांच्या घराण्याचा राजकीय वारसा आणि लोकांमधील विश्वास आजही कायम आहे.हा वारसा पुढे नेत सौ.शैलजा पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांचे पुत्र अक्षय पाटील हेही शिरोळ तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांमुळे ओळख निर्माण करत असून,त्यांना मिळणारा जनाधार या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावेल,असे मानले जात आहे.दरम्यान, राजमाता तालीम मंडळाचे अध्यक्ष अविनाश उर्फ प्रवीण सुरेशराव पाटील यांनी सौ.पाटील यांच्या उमेदवारीला जोरदार पाठींबा जाहीर केला आहे.मंडळाची संघटनात्मक ताकद प्रभागात मोठ्या प्रमाणात प्रभावी मानली जाते.त्यामुळे या पाठिंब्यामुळे शैलजा पाटील यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळाल्याचे दिसून येत आहे.अक्षय पाटील यांनी प्रभागात केलेल्या विकासकामांना आणि सातत्याने जपलेल्या लोकसंपर्काला नागरिकांची साथ लाभत आली आहे. त्यांच्या कार्याचा आणि संपर्काचा लोकांमध्ये चांगला ठसा उमटला असून,हेच पाठबळ मतांच्या रूपाने सौ.शैलजा पाटील यांना मिळेल,असा विश्वास त्या व्यक्त करतात. नागरिकांनी भरघोस मतांनी निवडून देऊन आपले प्रेम आणि विश्वास दाखवावा,असे आवाहन त्यांनी या वेळी केले.प्रभाग क्रमांक १ मधील ही निवडणूक विविध राजकीय घटकांमुळे रंगतदार होणार असून,आगामी दिवसांत प्रचाराला गती मिळणार आहे.