शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवार म्हणून कृष्णा देशमुख यांनी अर्ज भरला आहे.कोणताही राजकीय वारसा नसताना,देशमुख यांनी शिरोळ नगर परिषदेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.देशमुख यांनी मागील दहा वर्षापासून आंदोलन अंकुश संघटनेच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सक्रियपणे काम केले आहे.त्यांनी शेतकऱ्यांना योग्य ऊस दर मिळवून देण्यासाठी रस्त्यावर अनेक वेळा आंदोलन केले असून, निस्वार्थी आणि निर्भीडपणे प्रशासनाशी भांडणारा कोणतीही तडजोड न करता कायदेशीर मार्गाने लढणारा अशी शहरात कृष्णा देशमुख यांची ओळख असून शहरातील बेकायदेशीर आणि नियमबाह्य कामांवर अंकुश आणण्याचे कामही त्यांनी केले आहे,ज्यामुळे नागरिकांच्या विश्वासाला बळकटी मिळाली आहे.दरम्यान,अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात “आगामी काळात हे काम करू” असा अजिंठा घेऊन उतरत आहेत.परंतु कृष्णा देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले की,आम्ही दहा वर्षांपासून केलेल्या कामांचा जोरावर निवडणुकीस सामोरे जात आहोत.नवीन वचन देण्यापेक्षा,प्रत्यक्ष केलेल्या कामांवर विश्वास ठेवला पाहिजे असे मत कृष्णा देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.अपक्ष उमेदवार कृष्णा याच्या उमेदवारीला सर्वसामान्य शेतकरी मतदार यांच्यातून पाठिंबा मिळत आहे.शिरोळ नगरपरिषद निवडणूक 2025 साठी प्रभाग क्रमांक 10 मधील ही लढाई अपक्ष उमेदवार आणि मोठ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी यांच्यातील संघर्ष म्हणून पाहण्यासारखी ठरत आहे.