प्रभाग सात मधून शरद मोरे व दिपाली फल्ले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी जोर धरत असताना, प्रभाग क्रमांक सातमधून शरद उर्फ बापू मोरे व सौ.दिपाली विवेक फल्ले यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.शिव शाहू आघाडी प्रणित यादव पॅनल तर्फे दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज सादर केल्याने या प्रभागातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.सर्वसाधारण पुरुष गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणारे शरद उर्फ बापू मोरे हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले असून स्थानिक पातळीवर सामाजिक व नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे निस्वार्थी नेतृत्व म्हणून ओळखले जातात.तरुणांना रोजगार निर्मिती व मार्गदर्शन यामुळे प्रभागातील मतदारांमध्ये त्यांची चांगली छाप निर्माण झाली आहे.तर ओबीसी महिला राखीव गटातून सौ.दिपाली विवेक फल्ले यांनी अर्ज दाखल करताच महिला मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.महिलांसाठी स्वावलंबन, आरोग्य सुविधा तसेच सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर काम करण्याचा त्यांचा संकल्प असून,युवतींच्या पुढे येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने पॅनलचे पदाधिकारी,कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.यादव पॅनलकडून प्रभाग क्रमांक सातमध्ये मजबूत लढत दिली जाईल,असा विश्वास पॅनलच्या नेत्यांनी व्यक्त केला.दोन्ही उमेदवारांच्या अर्जामुळे प्रभाग क्रमांक सातमधील निवडणुकीची रंगत अजूनच वाढली असून मतदार कोणाला पसंती देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!