शिरोळ नगरपालिकेसाठी शनिवारी विक्रमी २७ उमेदवारांचे अर्ज दाखल

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारी नगरसेवक पदासाठी २७ उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक विभागात दाखल केले.शनिवारअखेर नगरसेवक पदासाठी एकूण ३३ तर नगराध्यक्ष पदासाठी १ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.शनिवारी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्यासह मातब्बरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

शनिवारी सकाळपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसह समर्थकांची मोठी गर्दी निवडणूक विभागात झाली होती. काही उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर अनेक उमेदवार उमेदवारी अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यात मग्न होते.त्यामुळे अनेक कॅफेंमध्ये उमेदवार आणि त्यांचे समर्थक दिसत होते.रविवारीही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.यामुळे रविवारी काही उमेदवार आपले अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे

प्रभाग १ – पृथ्वीराजसिंह अशोकराव यादव,सौ. विदुला विराजसिंह यादव,

प्रभाग २ – सौ अनिता गजानन संकपाळ,सौ नीलिमा अवधूत माने, 

प्रभाग ३ – आनंदा गब्बर सकट, श्रीवर्धन शिवाजीराव माने देशमुख, राजेंद्र दत्तात्रय माने

प्रभाग ४ – सौ. शारदा सुनील माने, सौ अनिता अवधूत पाटील देसाई,सौ. हेमलता शिवाजीराव जाधव,सौ. श्वेता संतोष जाधव

प्रभाग ५ – विठ्ठल सूर्यकांत पाटील, सौ सविता बबन पुजारी, सौ अस्मिता आशुतोष माळी, कृष्णात श्रीकांत पाटील 

प्रभाग ६ – रवींद्र जनार्दन पाटील, धनाजी बापूसो पाटील, वैशाली अनिल भारमल,

प्रभाग ७ – सौ ‌शुभांगी निळकंठ फल्ले, निशा नीलकंठ फल्ले,

प्रभाग ८ – दीपक कृष्णराव भाट, प्रमोद बाबासाहेब लडगे, सौ स्वाती बजरंग संकपाळ

प्रभाग ९ – अमरसिंह शिवाजीराव पाटील,सौ भाग्यश्री प्रमोद लडगे, अजिंक्य प्रतापसिंह पाटील

प्रभाग १० – किरण बाळासो माने

या उमेदवारांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी अनिलकुमार हेळकर यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

चौकट

प्रभाग क्रमांक पाच मधील राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवार सौ अस्मिता आशुतोष माळी यांनी हलगीच्या कडकडात शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राजर्षी शाहू आघाडीचे मान्यवरासह समर्थक मोठ्य संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!