शिरोळ नगरपरिषद प्रभाग क्र.६ मधून शुभांगी कोळी यांचा ताराराणी आघाडी कडून उमेदवारी दाखल

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्र.६ मध्ये राजकीय चुरस वाढताना दिसत आहे.अनुसूचित जाती-जमाती महिला प्रवर्गातून ताराराणी आघाडीकडून शुभांगी अशोक कोळी यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून,त्यांनी औपचारिकपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील महिला म्हणून राजकारणात उभं राहण्याची संधी मिळाल्यानंतर शुभांगी कोळी यांनी याला सामाजिक बदलाची पहिली पायरी मानत मतदारांचे आभार मानले आहेत.शुभांगी कोळी या गेल्या काही वर्षांपासून प्रभाग ६ मधील महिलांच्या प्रश्नांची जाण आहे.प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था,महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणीची करण्यासाठी ताराराणी आघाडीने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे.प्रभागातील नागरिक विशेषतः महिलांकडून शुभांगी कोळी यांच्या उमेदवारीचे स्वागत करण्यात येत आहे. स्थानिक मतदारांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून पाठिंबा व्यक्त केल्याचेही पाहायला मिळत आहे. सामान्य कुटुंबातील महिलेला राजकीय व्यासपीठावर नेतृत्वाची संधी देत आघाडीने प्रभागातील महिलांच्या अडचणी सभागृहात मांडून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याचे मत व्यक्त होत आहे.शुभांगी कोळी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी प्रभाग ६ मध्ये लक्षवेधी ठरत आहे.स्थानिक विकासासोबतच महिला सक्षमीकरण हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे कोळी यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!