प्रभाग ८ मधून सामान्य कुटुंबातील अमित कोळीला नेतृत्व करण्याची संधी, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार लढत

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून मागास प्रवर्गातील सर्वसामान्य कुटुंबातील अमित गणेश कोळी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरणार आहे.प्रभागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या सुखदुःखात धावून जाणारा, कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता प्रामाणिकपणे काम करणारा हक्काचा माणूस म्हणून अमित कोळी यांची ओळख असून, त्यांच्या उमेदवारीचे प्रभागात स्वागत करण्यात येत आहे.अमित कोळी यांनी गेल्या काही वर्षांत प्रभागातील सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करून सर्वसामान्य गरजू लोकांना मदत केली आहे.सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाल्याने लोकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी धडपड करणारा ‘आपला माणूस’ अशी त्यांची प्रतिमा प्रभागात निर्माण झाली आहे.विविध उत्सव,सामाजिक उपक्रम, शैक्षणिक मदत,आरोग्य शिबिरे तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या गरजांकडे व्यक्तिगत लक्ष देऊन कामांच्या माध्यमातून जनतेशी नाळ घट्ट केली आहे.माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी ही “काम करणाऱ्यालाच संधी” या तत्त्वावर अमित कोळी यांना उमेदवारी दिल्याचे आघाडीतील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.सामान्य कुटुंबातील तरुणाला दिलेली ही संधी म्हणजे प्रभागातील सर्वसामान्य जनतेचा सन्मान असल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे प्रभागातील तरुणांनी स्वागत करत त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. “अडचणीच्या वेळी ज्याच्याकडे धाव घेऊ शकतो असा हक्काचा माणूस म्हणजे अमित,” असे मत अनेक तरुण मतदारांनी व्यक्त केले.ज्येष्ठ नागरिकांनीही प्रभागाच्या नेतृत्वासाठी आपला सोबत राहून काम करणाऱ्या तरुणाची निवड केल्याबद्दल अमरसिंह पाटील यांचे आभार मानले आहेत. अमित यांच्याकडे प्रभागाचे नेतृत्वाची क्षमता आहे,असे त्यांचे म्हणणे आहे. आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत होणार असल्याने राजकीय वातावरणात उत्सुकता वाढली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!