शिरोळ नगरपरिषदेच्या प्रभाग १ मधून राजर्षी शाहू आघाडीचा उच्चशिक्षित साजिद मुल्लाणी निवडणूक मैदानात

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) गटातून राजर्षी शाहू आघाडीकडून साजिद रमजान मुल्लाणी यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.युवकांचे प्रतिनिधित्व करणारा, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम तसेच क्रीडाक्षेत्रातही उल्लेखनीय यश मिळवलेला उमेदवार असा त्यांचा परिचय असून घोषणेनंतर स्थानिकांमध्ये उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.साजिद मुल्लाणी हे बी.टेक (सिव्हिल) इंजिनियर असून त्यांनी राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू म्हणूनही आपली मुहर उमटवली आहे.शैक्षणिक गुणवत्ता, तांत्रिक ज्ञान आणि खेळाडू वृत्ती यांचा समन्वय असलेला उमेदवार देण्याचा आघाडीने घेतलेला निर्णय हा तरुण मतदारांसाठी आकर्षणाचा मुद्दा ठरत आहे. इंजिनियरिंग क्षेत्रातील मोठा अनुभव आणि नागरी समस्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची क्षमता यामुळे विकासाभिमुख नेतृत्वाची अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत.या उमेदवारीनंतर बोलताना राजर्षी शाहू आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक १मध्ये स्वच्छता,पायाभूत सुविधा, रस्ते-विकास, पाणी पुरवठा आणि क्रीडा-सुविधा या प्रमुख गरजांच्या समाधानासाठी अभ्यासू आणि लोकसंग्रह असलेला उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला.साजिद मुल्लाणी यांच्या माध्यमातून आधुनिक दृष्टिकोनासोबतच युवकांना राजकीय क्षेत्रातून काम करण्याची संधी मिळेल असा त्यांचा विश्वास आहे. दरम्यान उमेदवारीबद्दल प्रतिक्रिया देताना साजिद मुल्लाणी म्हणाले की,शिरोळ शहराचा विकास, स्वच्छ आणि सुरक्षित प्रभाग, तसेच तरुणांसाठी रोजगार व क्रीडा संधी निर्माण करणे हा माझा प्राधान्यक्रम असेल.नागरिकांचा विश्वास हीच माझी ताकद असून विकासाच्या कामात पारदर्शकता आणि जबाबदारी जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.तर साजिद यांची उमेदवारी जाहीर होताच स्थानिक तरुण,क्रीडा क्षेत्रातील सहकारी आणि विविध सामाजिक संघटनांचा मुल्लाणी पाठिंबा मिळत केले.राजर्षी शाहू आघाडीच्या या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक १ मधील निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!