पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
लोकजनशक्ती पार्टी ( रामविलास पासवान ) ची पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक सातारा येथे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील कार्यकारिणी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी तासगांव ता. हातकणंगले येथील प्रभाकर गोविंद कुरणे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र राष्ट्रीय उपाध्यक्ष शमीम हवा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . या वेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षापदी सौ. प्रियांकाताई भगवान कांबळे यांची ही निवड करण्यात आली. या निवडीच्या वेळी संजय आल्हाट पुणे, सतिश कुरणे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, करण गायकवाड, अर्जुन कांबळे, संदीप कांबळे, भगवान कांबळे, उमेश इंगवले, सचीन जाधव, प्रणय कुरणे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.