मांत्रिक किशोर लोहार व अभिजित बाबासो मोहिते याना एक दिवसाची पोलिस कोठडी 

Spread the love

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे 

पुलाची शिरोली येथील स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी अशी पूजा करणाऱ्या मांत्रिक किशोर लोहार व अभिजित बाबासो मोहिते याना आज न्यायालयात हजर केले असता त्याना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली तर ज्याच्यासाठी पुजा केली तो रमेश गावकर याला अद्यापही ताब्यात घेतले नाही पोलिस त्याचा शोधात असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे यानी सांगितले .शिरोली पोलिसांनी १५ दिवसापासून फरार असणारा मांत्रिक किशोर लोहार व व्हिडिओ चित्रीकरण करणारा अभिजित मोहिते यास गुरुवारी अटक करण्यात आले होते या दोघाकडे शिरोली पोलिसानी कसून चौकशी केली असता त्यानी बेळगाव येथील रमेश गावकर याचा आजारपण बरा होण्यासाठी शिरोलीच्या स्मशानभूमीत पुजा केली असल्याचे पोलिसांसमोर मान्य केल्याने लोहार व मोहिते याना आज पेठवडगाव न्यायालयात मोरे कोर्टात हजर केले असता त्याना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली .अदिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक अमित पांडे करीत आहेत .बुधवारी लोहार व मोहिते याना अटक केल्यावर ज्यासाठी पुजा केली तो बेळगाव येथील रमेश गावकर याचे नाव प्रसारमाध्यमाना सांगितले पण गावकर गेली सहा वर्षापासून आजारी असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते पण आज गावकर यांच्याबाबत विचारणा केली असता त्यानी तो सापडत नसल्याचे सांगितले . पोलिसांनी गावकर बाबत दोन वेळा जे विधान केले संशयास्पद वाटते कारण गुन्हा करणारा हा पोलिसांसमोर संशयित आरोपीच असतो तो आरोपी आहे कि नाही न्यायव्यवस्थेला ठरवण्याचा अधिकार असतो हे मात्र शिरोली पोलिसाना विसर पडलेला असावा म्हणून त्यानी दोन्ही वेळेस वेगवेगळे विधान केले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक अमित पांडे करीत आहेत

Leave a Comment

error: Content is protected !!